बारामतीतील शिकवू विमानाचा इंदापूर तालुक्यात अपघात; शिकावू विद्यार्थिनी जखमी


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुलै २०२२ । बारामती । कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत आज 11:20 ते 11:25 वाजेदरम्यान कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड वय २२ वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले. कु. भविका राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!