उद्योजकांसाठी बारामती एमआयडीसीचे कार्य अग्रेसर

प्रांताधिकारी वैभव नावडकर; वृक्षारोपन, स्वछता मोहीम व गुणवतांचा सन्मानाचे आयोजन


बारामती – एमआयडीसी वर्धापन दिन कार्यक्रमात प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेटकर व इतर.

दैनिक स्थैर्य । 3 ऑगस्ट 2025 । बारामती। राज्यातील प्रत्येक उद्योग व उद्योजक टिकला पाहिजे. त्याला सर्व प्रकारच्या सेवा सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केलेले कार्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून त्यात बारामती अग्रेसर असल्याचे, प्रतिपादन बारामतीचे प्रांत अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा वर्धापन दिन नुकताच आयोजित करण्यात आला होता.
त्या वेळी वैभव नावडकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक संभाजी होळकर , महाराष्ट्र चेंबर्सचे चेअरमन शरद सूर्यवंशी, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन अध्यक्ष धनंजय जामदार व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेटकर व उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यालयाचे अधिकारी सचिन यादव, बाळराजे मुळीक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. चंद्रकांत मस्के, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी किशोर माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, महावितरणचे कार्यकारी अभियंता सोलनकर, प्रकाश देवकाते, तालुका कृषी अधिकारी महेश हाके, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता मनोज जगताप व विविध खात्यातील अधिकारी आणि एमआयडीसीचे अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

 

प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील म्हणाले, बारामती एमआयडीसीची स्थापना झाल्या पासून ते आजपर्यंत प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान आहे. त्यामुळे वर्धापन दिन साजरा करताना कौटुंबिक स्नेहमेळावाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या पुढेही उद्योग व उद्योजक यांना नेहमी सेवा सुविधा देण्यासाठी व बारामती एमआयडीसी प्रथम क्रमांकावर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.

एमआयडीसी स्थापन झालेपासून ते आता पर्यंत राज्यातील प्रगती व बारामतीमधील विकास यांचा आढावा घेऊन घेऊन मा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योगदानाची माहिती मान्यवरांनी सांगितली.

एमआयडीसी अधिकारी व कर्मचारी यांचे पाल्य यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व 25 वर्ष सेवा पूर्ण केल्याबद्दल कार्यकारी अभियंता विजयानंद पेटकर, उपअभियंता जेजुरी सिद्धार्थ कदम यांचा सन्मान करण्यात आला.
या दरम्यान, एमआयडीसी कॉलनी येथे वृक्षारोपन व स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. सहायक अभियंता सौ. व्ही. जी. चौलंग यांनी प्रास्ताविक केले.

राहुल लोंढे यांनी बासरी व पियानो वादन करून विविध गाणी सादर केली. ’चांडाळ चौकटी’ च्या वेबसिरीजमधील कलाकारांनी तंटामुक्ती नाटिका सादर केली. सावळेपाटील सूत्रसंचालन केले. महाव्यवस्थापक गणपत कोळेकर यांनी आभार मानले.

 


Back to top button
Don`t copy text!