बारामती कराटे असोसिएशनच्या खेळाडूचा अजित पवार यांच्या हस्ते सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑगस्ट २०२२ । बारामती । बारामती कराटे असोसिएशनला राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ४ सुवर्णासह ३रौप्य व १ कांस्य पदक.  दिनांक २६ ते २८ दरम्यान महाराष्ट्र कराटे असोसिएशनच्या वतीने ४३ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन संघटनेचे चेअरमन संदिप साळवी , महासचिव जॉजी इबराहिम तसेच खजिनदार रत्नकांत वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलमधील बॉक्सिंग हॉलमध्ये करण्यात आले होते या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तर निवड चाचणी घेण्यात आली होती त्यामध्ये बारामती कराटे असोसिएशनच्या ८ खेळाडूंनी सहभागी होत पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून सर्व ८ खेळाडूंची निवड या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता झाली होती त्यातून ६ खेळाडूंनी उत्तम कामगिरी करीत ४ सुवर्णाबरोबरच ३रौप्य व १कांस्य पदकाची भरघोस कमाई केली.
आदरनीय अजितदादा पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र ऑलि्पिक असोसिएशने कराटे खेळासाठी महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नारायण शिरगावकर यांच्यावतीने नुकतीच मान्यताप्राप्त युनिट म्हणून महाराष्ट्र कराटे असोसिएशनला मान्यता देण्यात आली आहे त्याचा कराटे खेळाडूंना चांगल्या भविष्यासाठी फायदा होणार आहे असे संघटनेचे चेअरमन यांनी त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणात प्रतिपादन केले.
बारामती कराटे असोसिएशनच्या
८ खेळाडूनी दोन दिवस झालेल्या ६ वर्ष ते १४ वर्षाआतील तसेच १८ वर्षांवरील खुल्या गटात विविध वजनी गटामध्ये खालील प्रमाणे मेडल मिळवले
१)आर्या रविंद्र करळे -६ वर्ष फाईट- १ रौप्य पदक

२)रोनक सय्यद -११ ते १२ वर्ष फाईट – १रौप्य पदक

३)श्रुती शंकर करळे – १२ ते १३ वर्ष फाईट +४७kg १ सुवर्ण , काता १रौप्य

४)सिद्धी शंकर करळे-१२ ते १३ वर्ष फाईट -४७kg १सुवर्ण

५)सत्यजित गायकवाड –
१२ ते १३ वर्ष फाईट +५० किलो
१ कांस्य पदक

६)कु.श्रुती पानसरे १८ वर्षांवरील गटामध्ये – ५०किलो – १सुवर्णपदक
टीम कुमिते – १सुवर्णपदक मिळवले.

सर्व यशस्वी खेळाडूंना बारामती कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक सेन्सई रविंद्र बाळकृष्ण करळे व सेन्सई अभिमन्यू बाबासाहेब इंगुले,महेश डेंगळे ,मुकेश कांबळे इत्यादि यांनी मार्गदर्शन केले तसेच असोसिएशनचे मार्गदर्शक व आधारस्तंभ शरयू फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार,अजित दादा पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील,जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे,तहसीलदार विजय पाटील,जिल्हा क्रीडा संकुल समिती सदस्य अविनाश लगड,बारामती तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, यांच्यासह बारामती मधील सर्व क्रीडा प्रेमीच्या वतीने खेळाडू व प्रशिक्षकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Back to top button
Don`t copy text!