
बारामती आणि परिसरातील तरुण उमेदवारांसाठी आय स्टेपअप कोडिंग अकॅडमीद्वारे 26 जुलै 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता मोठी IT जॉब ड्राइव्ह आयोजित केली आहे. ही ड्राइव्ह IT डिग्रीधारक, बी.सी.ए., बी.सी.एस., बी.एस.सी.-CS/IT, BE, B.Tech, MCA, MCS, Diploma (CS/IT) या माध्यमातून 2023, 2024 आणि 2025 मध्ये पास झालेल्या अथवा अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. येथे थेट अर्जदारांचे मुलाखती होतील आणि निवड झालेल्यांना नोकरी मिळणार आहे. सर्व प्रक्रिया – अॅप्टिट्युड टेस्ट, प्रॅक्टिकल टेस्ट, इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंट – या सर्व मोफत झाल्या आहेत.
उपलब्ध पदे आणि पात्रता :
पदे : फुल स्टॅक डेव्हलपर, मोबाइल ॲप डेव्हलपर, डेटा ॲनालिस्ट / डेटा सायंटिस्ट, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, इंटर्नशिप (फ्रेशर्ससाठी)
पात्रता : BCA, BCS, भी.बी.ए.-CS, BSc-CS/IT, BE, B.Tech, MCA, MCS, Diploma (CS/IT) पदवीधर. 2023, 2024 आणि 2025 चे पास झालेले किंवा अंतिम वर्षी असलेले विद्यार्थी. फ्रेशर तसेच 0 ते 3 वर्षांचा अनुभव असलेले उमेदवारही पात्र.
मुलाखतीच्या प्रक्रियेचे टप्पे :
- ऑफलाइन अॅप्टिट्युड आणि टेक्निकल MCQ टेस्ट : सर्व उमेदवारांनी हा टेस्ट द्यावा.
- मशीन/प्रॅक्टिकल टेस्ट : प्रत्यक्षात कोडिंग कौशल्याची चाचणी घेतली जाईल.
- टेक्निकल इंटरव्ह्यू (पॅनल राऊंड) : शेवटी तांत्रिक ज्ञानाची चाचणी विशेषज्ञ पॅनेलकडून घेतली जाईल.
आवश्यकता : स्वतःचा लॅपटॉप, रिझ्युमची हार्ड कॉपी, औपचारिक पोषाख अनिवार्य
मुलाखतीची तारीख : शनिवार, 26 जुलै 2025
वेळ : सकाळी 10:00 वाजता
ठिकाण : आय स्टेपअप कोडिंग अकॅडमी, बारामती बस स्टँड समोर
रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांनी 24 जुलै 2025 च्या आत गुगल फॉर्मवर नोंदणी करावी.
रजिस्ट्रेशन लिंक: forms.gle/iu5mZhcp4r6EzidF6
अधिक माहितीसाठी संपर्क: 9579985123
संकेतस्थळ: istepup.in
IT क्षेत्रातील करिअर करणाऱ्या बारामती, फलटण, इंदापूर, भिगवण, दौंड, करमाळा आणि सातारा या परिसरातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या ड्राइव्हद्वारे प्रत्यक्ष मुलाखतीतून नोकरी मिळवणे शक्य होत आहे. सर्व प्रक्रिया मोफत असल्याने आर्थिक अडथळ्याशिवाय तरुणांना IT सेक्टरमध्ये प्रवेश मिळू शकेल.