
दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सर्व मालोजीराजे शिक्षक – शिक्षकेतर कायम सेवकांची पतसंस्था फलटण पतीने सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, साप्ताहिक ‘रामआदेश’ चे संपादक बापूराव जगताप यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डी एम कोळेकर उपप्राचार्य सुधीर अहिवळे , पतसंस्थेचे चेअरमन विजय कुमार लोंढे व व सचिव अनिल शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बापूराव जगताप हे स्वतः मालोजीराजे शिक्षक-शिक्षकेतर कायम सेवकांच्या पतसंस्था चे पाच वर्षे चेअरमन म्हणून त्यांनी कारभार पाहिला आहे. सध्या ते या पतसंस्थेचे संचालक आहेत.
बापूराव जगताप यांनी आपल्या शैक्षणिक सेवेची सुरुवात १९८८ ला केली.१९८८ ते १९२ श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयामध्ये ते कार्यरत होते.१९९२ ते ९७ मुधोजी हायस्कूल मध्ये त्यांनी सेवा केली.१९९७ ते २०११ कालावधीमध्ये श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय मध्ये पुन्हा सेवा केली.२०११ पासून ते वडले येथे कार्यरत होते. त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात रामनगर या साप्ताहिकाचा पासून केली.याचा पहिला अंक श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला होता. सध्या ते साप्ताहिक रामआदेश चे संपादक असून त्यांनी फलटण पंचायत समितीमध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून ही कार्यभार पाहिला आहे. त्यांनी वडले या ठिकाणी बारा वर्षे सेवा दिली.ते तिथे सेवानिवृत्त झाले.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डी. एम कोळेकर उपप्राचार्य सुधीर अहिवळे, पतसंस्थेचे चेअरमन विजयकुमार लोंढे, सचिव अनिल शिंदे, मनोज कदम, प्रा. उत्तम घोरपडे सर, बाळासाहेब ननावरे, विजय नांगरे, हरिभाऊ मोरे, संतोष जाधव सर व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.