दैनिक स्थैर्य । दि. ११ मार्च २०२२ । गोखळी । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गोखळी येथील बापूराव बाळासाहेब गावडे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
गावडे यांचे प्रा. शिक्षण जिल्हा परिषद प्रा. शाळा पंचबिघा, माध्यमिक व उच्च शिक्षण हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी, पदवी शिक्षण मुधोजी महाविद्यालय फलटण येथे झाले.
बापूराव गावडे यांच्या निवडीने आणखी एक मानाचा तुरा गोखळीच्या शिरपेचात खोवला आहे यामुळे गोखळी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी बापूराव गावडे यांचे अभिनंदन केले.