दैनिक स्थैर्य । दि.२० मार्च २०२२ । फलटण । कोरोनाचा हाहाकार, लांबलेल्या परिक्षा, भविष्याची अनिश्चितता पण जिद्द चिकाटीच्या जोरदार लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या बापूराव गावडे यांचा नुकताच गोखळी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.शेतकरी कुटुंबातील बापूराव गावडे यांनी आपल्याला मिळालेल्या यशामध्ये आई, वडीलाचे प्रोत्साहन व विशाल गावडे यांच्या मार्गदर्शन माझ्या यशात खुपचं मोलाचं ठरलें असे सांगितले.गावातील हनुमान माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन पुणे विद्यापीठात प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला . लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे जात असल्याने अभ्यासात अडचणी आल्या त्यावर मार्ग काढून २०१९ मध्ये लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली मात्र निकालासाठी ८ मार्च २०२२ उजाडले असे गावडे यांनी सांगितले.यावेळी गोखळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार गावडे महाराष्ट्र बलुतेदार संघटनेचे राजेंद्र भागवत, जय मल्हार क्रांती सेनेचे आबासो मदने सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सागर गावडे पाटील पोलीस पाटील विकास शिंदे अध्यक्ष योगेश भागवत व सायकलिंग मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या कु. स्वरा भागवत, शेखर लोंढे, अभिजीत जगताप, दिलीप गावडे व गावडे कुटुंबीय यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार,शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.