दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२२ । फलटण । संजय गांधी निराधार योजनेच्या फलटण तालुका अध्यक्ष पदी खटकेवस्ती ता. फलटण येथील बापुराव गावडे यांची निवड करण्यात आलेली आहे. याबाबतचे आदेश फलटणचे तहसीलदार समीर यादव यांनी पारित केलेले आहेत.
बापुराव गावडे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याहस्ते निवडीचे पत्र स्वीकारले.
यावेळी निंभोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकुंद रणवरे, सनी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संजय गांधी निराधार योजनेच्या फलटण कार्यकारणीच्या निवडी नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये अध्यक्ष पदी बापुराव गावडे यांची निवड करण्यात आलेली आहे.
तर सदस्य सचिव म्हणून फलटणचे तहसीलदार हे असणार आहेत. यासोबतच भारत अहिवळे, रा. मंगळवार पेठ, फलटण, सौ. अवंतिका जाधव, रा. हणमंतवाडी, ता. फलटण, दिलीप अडसुळ, रा. माळवाडी, ता. फलटण, विकास नाळे, रा. मठाचीवाडी, ता. फलटण, सदाशिव जगदाळे, रा. सगुणामाता नगर, मलठण, फलटण, प्रतापसिंह निंबाळकर, रा. विद्यानगर, फलटण, दत्तात्रय गुंजवटे, रा. सोमंथळी, फलटण, ज्ञानेश्वर पवार, रा. वाघोशी, ता. फलटण, अर्जुन रूपनवर, रा. कोळकी, ता. फलटण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
यासोबतच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रभाग अधिकारी हे संजय गांधी निराधार योजना फलटण समितीचे सदस्य असणार आहेत.