पुरात वाहून गेलेल्या बनसोडे यांचा मृतदेह सापडला


दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । माण । पुळकोटी, ता. माण येथील ओढ्यात वाहून गेलेल्या उत्तम बनसोडे यांचा मृतदेह अखेर 36 तासांनी शिरताव ओढ्याजवळ सापडला आहे. याबाबत माहिती अशी, पुळकोटी, ता. माण येथील ओढ्याला आलेल्या पुराचा अंदाज न आल्याने शुक्रवारी रात्री पुळकोटी येथील मोटारसायकलसह दोनजण वाहून गेले होते. यातील एकजण बचावला होता तर उत्तम शंकर बनसोडे वय 50 हे बेपत्ता झाले होते. याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात रणजित चव्हाण यांनी तक्रार दाखल केली. म्हसवड पोलीस ठाण्याचे एपीआय विशाल भंडारे, पोलीस नितीन धुमाळ हे गेले दोन दिवस पट्टीच्या पोहणार्‍यांना घेऊन त्यांचा शोध घेत होते. परंतु, तिसर्‍या दिवसी 36 तासानंतर शिरताव हद्दीत त्यांचा मृतदेह मिळून आला. पोलीस नितीन धुमाळ यांनी जागेवरच पंचामाना केला तर वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कुलकर्णी यांनी उत्तरनिय तपासणी करुन मयत उत्तम बनसोडे यांचे प्रेत भाऊ भारत बनसोडे, पत्नी लता, मुलगा प्रतिक यांच्या ताब्यात दिले. सांयकाळी साडेपाच वाजता पुळकोटी येथील स्मशान भुमिका अंत्यसंस्कार करण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!