स्थैर्य, कातरखटाव : बनपुरी ( ता. खटाव ) येथील एका ३८ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने परिसरात कोरोनाची धास्ती वाढत चालल्याचे दिसून येते.
काही दिवसांपूर्वी राजस्थानी कनेक्शन ने चर्चेत आलेल्या बनपुरी येथील कोरोनाची साखळी प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्यातून खंडित करण्यात यश मिळवले होते. मात्र मुंबई येथें खासगी मालगाडीवर चालक म्हणून काम करणारा अडतीस वर्षीय युवक दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी आला होता.त्यास मायणी येथे कोरोन्टाईन करण्यात आले होते. या युवकास पोटाचा त्रास होत असल्याने फलटण येथे पंधरा दिवसांपूर्वी उपचार करण्यात आले होते. कोरोन्टाईन केल्यावर त्या युवकांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला असून पॉझिटिव्ह आला आहे.
बनपुरी येथे कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर पूर्ण गाव सील होणार याची चर्चा असतानाच रुग्णाच्या घराजवळचा माळवस्ती परिसर साठी कण्टेण्टमेंट झोन तर उर्वरित आहे गावासाठी बफर झोन करण्यात आला आहे.
त्याच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना मायणी येथे विलगिकरन कक्षात दाखल केले असून घराभोवतीचा परिसर सील करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाने सतर्कता बाळगत विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.