खरीप हंगामासाठीच्या कर्जाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२४: या अडचणीच्या काळात खरीप हंगामात बँकांना दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त पिक कर्ज वाटप करुन सर्वसमान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम बॅकांनी करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.

येथील नियोजन भवनात खरीप हंगाम 2021 पीक कर्ज पुरवठा, शेती विद्युत पंप व जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते. या बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे, आमदार मरकंद पाटील, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते.

खरीप हंगाम 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची मागणी केली आहे, अशा शेतकऱ्यांचे कर्जाची प्रकरणे मंजूर करावेत, अशा सूचना करुन, तौक्ते वादळामुळे विद्युत वितरण कंपनीचे विद्युत पोल पडले आहेत ते तात्काळ दुरुस्त करुन गावांमधील खंडीत झालेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरु करावा.


Back to top button
Don`t copy text!