दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । मुंबई । भारतातील एक आघाडीची फिन्टेक कंपनी ‘बँकइट’ने आपल्या महत्त्वपूर्ण अशा एजंट उपक्रमाअंतर्गत गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे गाठल्याची घोषणा केली. आपल्या अतुलनीय अशा वृद्धीपथाचा एक भाग म्हणून कंपनीने २०२१-२२ या आर्थिक वर्षात यशस्वीपणे ३४, ९११ आणि २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३०,३६३ नवीन एजंटांची भर घातली आहे.
दिल्ली एनसीआर, हैद्राबाद, मुंबई आणि गोपालगंज तसेच बिहारमधील सिवानमध्ये या आघाडीवर मोठ्या प्रमाणावर यश नोंदविले गेले. त्याशिवाय आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘बँकइट’च्या एजंट उपक्रमामध्ये तब्बल ६ ते ७ टक्के एजंट या महिला आहेत. या उपक्रमाच्या यशाने प्रेरणा घेवून कंपनीने २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात आणखी १,००,००० एजंटांचे जाळे नियुक्त करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
आजच्या आधुनिकतेच्या आणि डीजीटायझेशनच्या काळात डिजिटल साक्षरता आणि आर्थिक समावेशकता या प्राथमिक बँकिंग सेवा आजही आपल्या अर्ध्याधिक लोकसंख्येसाठी एक आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर ‘बँकइट’ ही आर्थिक सेवा आणि डिजिटल सेवांच्या बाबतीत मागास ग्राहक/ बाहेरून येणारे लोक यांच्यातील दरी भरून काढते. ग्रामीण, अर्धग्रामीण आणि शहरी भागांमध्ये जी डिजिटल निरक्षरता आहे तिचे निर्मुलन करण्याचे कंपनीचे लक्ष्य असून त्यासाठी किमान आर्थिक व बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यावर तिचा भर असेल. या सेवा नाविन्यपूर्ण, सुलभ आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
‘बँकइट’चे प्रवक्ता म्हणाले, “गेल्या दोन वर्षांमध्ये आमच्या बँक इट एजंट उपक्रमामध्ये एवढी मोठी उपलब्धी गाठल्याचा आम्हा ला मनस्वी आनंद आहे. ‘बँकइट’मध्ये आम्ही या क्षेत्रातील सर्वोत्तम फिन्टेक सेवा उपलब्ध करून देतो. त्या ग्राहकांच्या विविध गरजा योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतील, अशी अशा आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, एजंट उपक्रमाचा विचार करता येणारे आर्थिक वर्ष आमच्यासाठी अधिक आकर्षक ठरेल. त्याचे कारण म्हणजे आम्ही एकामागून एक महत्त्वाचे टप्पे रचत चाललो आहोत.”