स्थैर्य, मुंबई, दि.०९: आपल्या जागतिक समकक्षांकडून मूक संकेत मिळाल्यानंतर बेंचमार्क इंडेक्स निफ्टीने आज फ्लॅट स्थितीत सुरुवात केली. तथापि, बेल झाल्यानंतर, निफ्टीने सलग चौथ्या सत्रात उच्चांक गाठल्याने सर्वोच्च पातळीची प्रॉफिट बुकिंगदेखील अनुभवली. विक्रीचा दबाव अनुभवल्यामुळे इंडेक्सला उच्चांकी पातळी टिकवून ठेवता आली नाही. दिवसभरातील निचांकी पातळीवरून बेंचमार्क निर्देशांक सुधारला. संपूर्ण दिवसभरातील नुकसान भरून काढत काहीशा निचांकी पातळीवर स्थिरावला. बँकिंग आणि मेटल स्टॉकमुळे निर्देशांकांत घसरण झाल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले.
सेन्सेक्स आणि निफ्टी काहीसे फ्लॅट स्थितीत विसावले तरीही मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकाने अनुक्रमे अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त नफा कमावला. सेक्टरनिहाय कामगिरी पाहता, आयटी आणि डिफेन्सिव्ह फार्मा सेक्टर हे टॉप गेनर्स ठरले. तर बँकिंग आणि मेटल हे टॉप लूझर्समध्ये समाविष्ट झाले. तर पीएसयू बँकिंग सेक्टर टॉप लूझर ठरला. स्टॉकनिहाय पाहता, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्स हे टॉप गेनर्स ठरले. त्यांनी २% पेक्षा जास्त नफा कमावला. तर हिंडाल्को आणि टाटा स्टील हे १ टक्क्यांपेक्षा जास्त घट अनुभवत टॉप लूझर्समध्ये समाविष्ट झाले.
चर्चेत राहिलेले स्टॉक्स: सुंदरम क्लेटन या कंपनीने काल टीव्हीएस मोटर्समधील आपला ५ टक्के वाटा विकला. आघाडीच्या अॅसेट मॅनेजमेंट फर्मने कंपनीत वाटा अधिगृहित केला. दुसरे म्हणजे, कंपनी बोर्डाने क्यूआयबीद्वारे निधी वाढवण्यास मान्यता दिल्यानंतर इंट्रा डे दरम्यान श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्समध्ये जवळपास ३ टक्के वाढ झाली. अखेरीस, पिरामल एंटरप्रायझेस स्टॉक १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढला. एनसीएलटी बोर्डाने अडचणीतील मार्टगेज लेंडर डीएचएफएलच्या रिझोल्युशन प्लॅनला मान्यता दिल्यानंतर स्टॉकने नवा उच्चांक गाठला.
जागतिक आकडेवारी: जागतिक आघाडीवर, युरोपियन निर्देशांकाने उच्चांकी व्यापारच दर्शवला. डीएएक्स आणि सीएसी ४० निर्देशांकांनी सर्वोच्च पातळी गाठली. दरम्यान, वॉल स्ट्रीटवरील तिन्ही प्रमुख निर्देशांकाचे फ्यूचर्स फ्लॅट स्थितीत व्यापार करत होते. डाऊ जोन्स फ्युचर ०.०४ टक्क्यांनी, नॅसडॅक फ्युचर्स ०.५५ टक्क्यांनी तर एसअँडपी ५०० फ्युचर्स ०.२२ टक्क्यांनी वधारलेला दिसला. अमेरिकेच्या आर्थिक आघाडीवर, व्यापारविषयक आकडेवारी पाहता, एप्रिल २०२१ पर्यंत अमेरिकेचा ट्रेड गॅप ६८.९ अब्ज डॉलरपर्यंत आकुंचन पावला. मार्च महिन्यातील विक्रमी ७५ अब्ज डॉलरचा उच्चांक त्याने गाठला होता. सध्या तो बाजार अपेक्षांनुसार आहे.
एकूणच, ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ५२२७५ वर स्थिरावला. तो ५३ अंक किंवा ०.१० टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी५० १५७४० वर स्थिरावला. तो ११ अंक किंवा ०.०७ टक्क्यांनी घटला. येत्या काळात, अपसाइड दिशेने निफ्टीची पातळी १५८००-१५८५० पर्यंत पाहता येईल तर खालील दिशेने १५५०० च्या पातळीवर लक्ष ठेवावे लागेल.