दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२२ । पाटोदा । श्री बंकटस्वामी शिक्षण संस्था खडकीघाट शाखेच्या बंकटस्वामी विद्यालयातर्फे शालांत परीक्षा मार्च २०२२ मध्ये गुणानुक्रमे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला .यामध्ये कु. भोसले प्रगती गणेश 94.20% , कु. तावरे आदिती बाबासाहेब 94.20% मार्क घेऊन विद्यालयातून प्रथम तर सर्व व्दितीय कु. ढास प्रतिक्षा बळीराम 93.20%आणि सर्व तृतीय कु. जाधव पूजा बाबुराव 92.40% आली आहे.विद्यालयाचा निकाल 100% लागला असून विशेष प्राविण्य 13 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत.
विद्यालयातर्फे या गुणवंतांचा सत्कार शालेय समितीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच मा.बाबासाहेब तावरे.शालेय समितीचे उपाध्यक्ष सावरगावचे सरपंच मा.मधुकरराव गव्हाणे शालेय समितीचे सदस्य मा.धनंजय कोकाटे आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस वैकुंठवासी ह .भ. प. बंकटस्वामी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुणे मु.अ.यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यालयातून प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचेही हार आणि पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यालयातील श्री उंदरे सर श्री खाकरे सर श्री रिंगणे सर श्री सुपेकर सर श्री मोरे सर श्री आनेराव सर श्री बनसोडे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत सर यांनी
जे जे आपणास ठावे ते दुसऱ्यास द्यावे
शहाणे करून सोडावे सकल जनाशी
गुरु पौर्णिमेचे महत्त्व गुरुचे महत्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगून भविष्यात आई-वडिलांचे शाळेतील शिक्षकांचे नाव गाजवावे असे सांगितले. सावित्रीबाई फुले सुनीता विल्यम्स प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श घेऊन मुलींनीही खूप शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे. तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन खूप शिकून मोठे व्हावे असे सांगितले.
यानंतर गावकऱ्यांच्या वतीने व पालकांच्या वतीने गुरुपौर्णिमा असल्यामुळे विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार मा. बाबासाहेब तावरे आणि पालक यांनी केला. या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच युवक आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश भोसले बापू यांनी आपल्या काव्यमय शैलीत केले. तर आभार श्री आनेराव सर यांनी मानले व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.