शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रची अनोखी योजना; जिल्ह्यातील पहिला प्रयोग तरडगावात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : तरडगाव येथे बँक ऑफ महाराष्ट्र कडून शेतकरी व व्यापारी यांना आर्थिक पतपुरवठा नेहमीच करण्यात येतो. करोना या महाभंयकर आजारामुळे व्यापारी व शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यांना पुन्हा उभारी घेण्यासाठी खेळत्या भांडवलाची नितांत गरज आहे. अश्या काळामध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असताना सातारा जिल्ह्यात अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून किसान राहत योजनेच्या  अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पतपुरवठा करण्यासाठी सुरवात झालेली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपले पिक कर्ज नियमित भरलेले आहे, अश्या शेतकऱ्याना पीक कर्जाच्या पन्नास टक्के रक्कम ही तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. गॅरेंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाईन या योजेने अंतर्गत व्यावसायिकांना त्यांच्या कॅश-क्रेडिटच्या नुसार 20 टक्के रक्कम थोडक्या कागदपत्रांयाद्वारे दिली जात आहे. करोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी बँकेकडून हा पतपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यांमध्ये ही सेवा देणारी बँक ऑफ महाराष्ट्रची तरडगाव शाखा आघाडीवर आहे, असं बँक ऑफ महाराष्ट्र तरडगाव शाखेच्या वतीने सांगण्यात येत आहे. या कामासाठी शाखाधिकारी अभय चौधरी, मंगेश मुंगळे, कृषी अधिकारी महेश शेळके, कुंभार, बँकेचे बीसी रवींद्र मूल्या, नेहा शहा, सुवर्णा काकडे, रेखा अडसूळ, कमल मोहिते,संदीप दीक्षित, सोमनाथ अडसूळ हे कार्यरत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!