बंडा जोशी यांच्या हास्यपंचमी कार्यक्रमाने हसवले

झकास विनोद, फर्मास किस्स्याना रसिकांच्या टाळ्या आणि हशा मधून उत्स्फूर्त प्रतिसाद


सातारा – प्रेक्षकांसमोर हास्यपंचमी कार्यक्रम सादर करताना बंडा जोशी.
स्थैर्य, 14 मार्च, सातारा : ज्येष्ठ एकपात्री कलाकार आणि हास्यकवी बंडा जोशी यांनी सादर केलेल्या हास्यपंचमी या धमाल विनोदी एकपात्री कार्यक्रमाला सातारकर रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. झकास विनोद, फर्मास किस्स्यामधून निर्माण केलेल्या हास्यरसामध्ये रसिक न्हाऊन निघाले. रसिकांच्या टाळ्या आणि हशा यामुळे पाटक हॉल दणाणून गेला.

नगरपालिका व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी (सातारा) यांच्या वतीने, श्री.छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालय यांच्या विशेष सहकार्याने सुप्रसिध्द हास्य कलाकार आणि हास्यकवी बंडा जोशी यांचा एकपात्री हास्यपंचमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात डॉ. संदीप श्रोत्री, नगरवाचनालयाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, किशोर बेडकीहाळ, डॉ. राजेंद्र माने, कार्याध्यक्ष अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, संजय माने, सचिन सावंत, वजीर नदाफ,अमर बेंद्रे उपस्थित होते.

बंडा जोशी पुढे म्हणाले, माणसा माणसांमध्ये विविध कारणाने मानसिक तणाव वाढला आहे. महिलांना टेन्शन, मुलांना अभ्यासाचे टेन्शन,पुरुषांना कुटुंबाचे टेन्शन यातून बाहेर याचे असेल तर सर्वांनी खळखळून हसले पाहिजे. इतके खळखळून हसा की त्याचा जल्लोष झाला पाहिजे परमेश्वराने आपल्याला शरीर,मन,बुध्दी दिलेले आहे. या सर्वांना आपण जपले पाहिजे. याच्यावर ताण येता कामा नये. पु.ल. देशपांडे यांनी म्हटले आहे. एक कलावंत बोलत असतो आणि त्याच्या विनोदावर जे रसिक खळखळून हसतात ते जगातील सर्वात सुंदर दृश्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बंडा जोशी यांनी सादर केलेल्या हास्य कविता, विनोद, धमाल किस्से यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

अमित कुलकर्णी म्हणाले, दैनंदिन कामात आपण अडकून गेलो आहे. आपण आपल्या हास्य विसरलो आहे. बंडा जोशी यांचा कार्यक्रम खूपच कौतुकास्पद आहे. ते लोकांना हसवतात मानसिक ताण तणावातून दूर ठेवतात. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेने आजवर जे कार्यक्रम राबवले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. डॉ. संदीप श्रोत्री म्हणाले, सतत 15 वर्ष कार्यक्रम करणारी महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा ही पहिली शाखा आहे. शाहूपुरी शाखेकडून मराठी साहित्याचा सर्वांगीण विकास करता येईल असे उपक्रम नेहमीच राबवले जातात. प्रास्ताविक डॉ.राजेंद्र माने यांनी केले. सूत्रसंचालन अमर बेंद्रे यांनी तर आभार नंदकुमार सावंत यांनी मानले.

‘मी व माझे लेखन’ या विषयावर उद्या व्याख्यान

सोमवार दि. 16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सुप्रसिध्द लेखिका डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांच्या ’मी व माझे लेखन’ या विषयावरील व्याख्याने मराठी भाषा पंधरवड्याचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी अभिजित बापट, सातारा नगरपालिकेचे समाज कल्याण सभापती संकेत साठे, श्रीराम नानल, मसाप पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस, मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ उपस्थित राहणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!