स्थैर्य, सोलापूर, दि. 30 : कोरोना या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करणे यामुळे कारोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला 31 जुलै 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती संस्था अथवा संघटना यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे नमूद आदेशात म्हटले आहे.