दैनिक स्थैर्य | दि. 04 ऑगस्ट 2024 | फलटण | फलटण शहरामध्ये नागपंचमी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. या सणाचे पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शहरात पतंग उडविण्यात येतात. नायलॉन मांजा दोरा वापरला जावू नये, यासाठी फलटण शहर पोलीस ठाणे कडून फलटण शहरातील पतंग, पतंगाचा दोरा विकणाऱ्या १५ व्यावसायिकांना नोटीस दिली असून, नायलॉन दोरा विकू नये अश्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच पतंग उडविणारे व्यक्तीकडे सुद्धा ते नायलॉन मांजा दोरा वापरतात का, याची तपासणी करण्यात येणार आहे. नायलॉन दोरा वापरल्यास त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
तसेच नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, फलटण यांचे तर्फे वरील विषयाबाबत करण्यात येणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात फलटण शहर पोलीसांनी सहभाग घेतला आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)