
दैनिक स्थैर्य । 17 मे 2025। सातारा। सातारा जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई यंत्र यांचा वापर काही असामाजिक तत्वांकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या स्थळांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी शनिवार दि.17 मे ते मंगळवार दि. 03 जून या कालावधीत ड्रोन उडविण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कायद्यांन्वये कारवाई करण्यात येईल, असा आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला आहे. या आदेशाच्या प्रत प्रभारी पोलीस अधिक्षक,उपविभागीय दंडाधिकारी,कार्यकारी दंडाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.