कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ६ मे पर्यंत शस्त्र व जमावबंदी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२३ । सातारा । सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम चे कलम  37 (1) (3) अन्वये दि. 21 एप्रिल 2023  रोजीच्या मध्यरात्री 0.00 पासून  ते दि. 6 मे 2023 रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केला आहे.

या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुऱ्या, काठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा अस्त्र, सोडावयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यारे किंवा साधणे बरोबर घेणे, जमा किंवा तयार करणे, व्यक्तीची     अगर प्रेते किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, सभ्यता अगर नितीविरुद्ध याविरुध्दअसतील अशी किंवाराज्याची   असतील अशी किंवा  राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी चित्रे – चिन्हे, फलक अगर इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांत प्रसार करणे अशा मनाईचे उल्लंघन करुन जर कोणत्याही इसम अशी कोणतीही वस्तु बरोबर घेवून जाईल किंवा कोणताही जिन्नस दाहक पदार्थ किंवा अस्त्र जवळ बाळगतील तर तो कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांकडून निशस्त्र केले जाण्यास  किंवा दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ क्षेपणास्त्र त्यांच्याकडून जप्त केले जाण्यास पात्र असेल आणि अशा तऱ्हेने जप्त केलेल्या वस्तू दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ, क्षेपणास्त्र हे सरकार जमा होईल. पोटकलम (3) अन्वये असलेल्या अधिकारान्वये सार्वजनिक सुव्यवस्था रोखण्यासाठी जमावास मिरवणूकीस वरील कालावधीत व कार्यक्षेत्रात या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे.

शासनाची सेवा करणारे किंवा नोकरी करण्याच्या कामी ज्यांच्या वरीष्ठांनी निर्दीष्ट केल्यावरुन अगर त्यांना कर्तव्याच्या स्वरपामुळे अशी खंड 1 मध्ये उल्लेखलेल्या पैकी वस्तु धारण करणे किंवा देणे आवश्‌यक आहे. ज्यांना शारिरीक दुर्बलतेच्या कारणावरुन जिल्हादंडाधिकरी अगर त्यांना प्राधिकृत केलेले अधिकाऱ्यांना लाठी किंवा काठी वापरण्यास परवानगी दिली असेल अशी व्यक्ती.    सदरचा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्यास लागू होणार नाही.

ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच संबंधित  पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.


Back to top button
Don`t copy text!