
स्थैर्य, सातारा, दि. २३ : राज्य शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व धार्मिक कार्यक्रम करता येणार नसून त्यास बंदी राहणार आहे. यामुळे नागरिकांनी एकत्र येऊ नये अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वादग्रस्त मुद्दे मांडले. त्यांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सूचना दिल्या. त्यात सदरबजार येथील कत्तल खान्याला परवानगी देण्यात येणार नाही, असा ही निर्णय झाला.
बकरी ईदच्या अनुषंगाने अलंकार हॉल पोलीस करमणूक केंद्र सातारा येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पडली. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, नगराध्यक्ष माधवीताई कदम, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय पोलिस अधिकारी समीर शेख, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, तहसीलदार आशा होळकर, मुख्याधिकारी रंजना गगे, पोनि अण्णासाहेब मांजरे सातारा शहर, सपोनि विशाल वायकर, वानिशा सातारा शहर विठ्ठल शेलार उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी उपस्थिताना महाराष्ट्र शासन यांच्याकडील मार्गदर्शनाप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याचे सांगितले. तसेच येणारा बकरी ईद सण शांततेत पार पाडणे बाबत सूचना दिल्या. तसेच सणाच्या अनुषंगाने शुभेच्छा देखील दिल्या. प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी महाराष्ट्र शासन यांच्याकडील बकरी ईद 2020 अनुषंगाने प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना उपस्थिताना वाचून दाखवल्या.पोलीस अधीक्षक सातपुते यांनीही बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा इदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी, नागरिकांनी प्रतीकात्मक कुर्बानी करावी, असे आवाहन करत सदरबाजार येथील कत्तलखान्याला परवानगी देण्यात येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी कत्तली करता येणार नाही. बकरीच्या निमित्ताने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये याबाबत सूचना केल्या. यावेळी अनिस तांबोळी, सादिक शेख, सादिक बेपारी, फिरोज पठाण, मुक्तार पालकर, इरफान बागवान, चंद्रकांत खंडाईत, रमेश बोराटे , बाळासाहेब शिंदे, राहुल पवार, विजय काटवटे, धनंजय जांभळे, विकास गोसावी, आदी उपस्थित होते.