दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२३ । सातारा । कराड तालुक्यातील चिखली घोलपवाडी येथे मुख्य जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड योजने प्रारंभ करण्यात आला. यावेळी शेतकरी इंद्रजीत सावंत यांच्या शेतावर बांबू लागवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमास कराड तालुक्याच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते, कृषी अधिकारी संतोष जाधव, विस्तार अधिकारी श्री. स्वामी, कृषी विस्तार अधिकारी श्री.गायकवाड, श्री. जगताप, मिलिंद माने, चिखली घोलपवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
बांबू हे पीक ऊस पिकाला पर्यायी पीक असून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करणारे पीक आहे . त्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले.
जल जीवन मिशन या योजनेतील अपूर्ण कामांचा आढावा घेऊन संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक व मक्तेदार यांनी लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. तसेच वित्त आयोग व घरकुल या योजनेतील निधी जास्तीत जास्त खर्च करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.