स्थैर्य, वडगाव मावळ, दि.२५: गोवित्री विविध विकास सेवा सहकारी संस्थेत बनावट मतदार यादी बनवून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळात स्वतः उमेदवार असल्याचा बनावट ठराव मावळ तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात दाखल केल्याप्रकरणी नेवाळे यांच्यावर रविवारी (दि. 21) गुन्हा दाखल केला होता.
नेवाळे यांना सोमवारी (दि. 22) अटक केली. मावळ न्यायालयाने गुरुवारी (दि. 25) पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडी संपल्याने गुरुवारी (दि. 25) दुपारी 2.30 वाजता न्यायालयात हजर केले असता, नेवाळे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींना कामशेत पोलिसांनी गुरुवारी (दि. 25) रात्री अटक केली. शुक्रवारी (दि. 26) न्यायालयात हजर करणार आहे. एक आरोपी अद्यापही फरार असून, लवकरच अटक करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.
बाळासाहेब शंकर नेवाळे (वय 49, रा. गोवित्री, ता. मावळ) न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे.प्रकाश महादू गायकवाड (वय 45, रा. गोवित्री, ता. मावळ) व बाळू धाकलू आखाडे (वय 38, रा. कोळवाडी, ता. मावळ) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बापू बनाजी धडस हे फरार आहेत.
पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवाळे यांना सोमवारी (दि. 22) अटक केली. मावळ न्यायालयाने गुरुवारी (दि. 25) पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडी संपल्याने गुरुवारी (दि. 25) दुपारी 2.30 वाजता न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी नेवाळे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नेवाळे यांची येरवडा (पुणे) कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील उर्वरित प्रकाश महादू गायकवाड व बाळू धाकलू आखाडे या दोन आरोपींना कामशेत पोलिसांनी गुरुवारी (दि. 25) रात्री अटक केली असून शुक्रवारी (दि. 26) न्यायालयात हजर करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम करत आहेत.