बालशिवाजी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते भाजपात


स्थैर्य, फलटण, दि. ०९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ आणि ४ मधील बालशिवाजी गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मुकेश पवार, स्वप्नील देंगे आणि दुर्गेश हेंद्रे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकीय वातावरणात नव्या चर्चांना ऊत आला आहे.

गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय असलेल्या या तिघांच्या प्रवेशामुळे प्रभागातील भाजपची संघटनशक्ती आणखी मजबूत झाल्याचे चित्र आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील युवक कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ३ व ४ मधील ही गळती राजे गटासाठी धक्का असून, भाजप-राष्ट्रवादी महायुतीसाठी ती महत्त्वाची भर मानली जात आहे.


Back to top button
Don`t copy text!