
दैनिक स्थैर्य । 22 एप्रिल 2025। फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयातील मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांच्या मातोश्री बकुळाबाई नामदेव शिंदे यांचे रविवार दि. 20 एप्रिल रोजी आकस्मित निधन झाले. त्यांच्यामागे त्यांचे पती, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. दशक्रिया विधी मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी सकाळी ठीक 9 वाजता हिरडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर येथे करण्यात येणार आहे.