
दैनिक स्थैर्य । 26 जून 2025 । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण मधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत आधुनिक बेकरी तंत्रज्ञान व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यामध्ये बेकरी व्यवसायात साठीचा आराखडा तयार करणे, बेकरीचा प्रस्ताव तयार करणे, बेकरी साठी लागणारा कच्चा माल, त्याची पौष्टिकता, त्या पदार्थांचा बेकरी मधील पदार्थांमध्ये असणारे कार्य, बेकरी पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया, बेकरीसाठी लागणारे साहित्य व मशिनरी, बेकरी व्यवसायासाठी शासनाचे विविध परवाने, बेकरी पदार्थांसाठी लागणारे पॅकेजिंगचे साहित्य व मशिनरी, बेकरी व्यवसायातील स्वच्छता व त्यांचे नामांकन, बेकरी व्यवसायातील व्यवस्थापन आणि जमा खर्च ताळेबंद, बेकरी पदार्थांच्या किमती काढणे तसेच बेकरी व्यवसायात येणार्या विविध अडचणी आणि त्याचे निराकरण करणे अशा विविध बाबींवर सखोल माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्यामार्फत पदार्थ तयार करून घेतले जातात, अशाप्रकारे कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत बेकरीचे परिपूर्ण व्यावसायिक तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.
या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. आडत, उद्यानविद्या विभाग आणि कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

