बजाज फिनसर्वचे जीवन विमा फसवणुकींवर जनजागृती अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । बजाज फिनसर्व, हे भारतातील सर्वाधिक मोठे आर्थिक महामंडळ मानले जाते, त्यांच्या वतीने ‘सावधान रहें. सेफ रहें’ (सावधान रहा. सुरक्षित रहा.) च्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. हे एक सार्वजनिक जनजागृती अभियान असून त्याचा भर जीवन विमा फसवणूक प्रकरणांवर राहील. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनतेला सध्या घडत असलेल्या फसवणुकीच्या प्रकरणांविषयी सजग करण्यात येईल. हे अभियान कंपनीच्या सोशल मीडिया मंचांवर सुरू राहणार आहे.

या जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून बजाज फिनसर्वचे लक्ष्य ग्राहकांना जीवन विमा पॉलिसीशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण संदेश कळविण्याचे असणार आहे. विमा खरेदी करताना पॉलिसीविषयी सर्व दस्तावेज आणि त्यासंबंधी माहिती केवळ संकेतस्थळावरून काळजीपूर्वक तपासावी याकरिता आवाहन करण्यात येईल. बऱ्याचदा फसवणूक करणाऱ्यांकडून कमी प्रीमियमचे गाजर ग्राहकांना दाखवून लुबाडण्यात येते. यावेळी सादर करण्यात येणारी कागदपत्रे बनावट असतात. पॉलिसीधारकाने जीवन विमा कागदपत्रांची सत्यता तपासून घ्यावी; अस्सल आणि बनावट पॉलिसींमधील फरक ओळखणे तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे फसवणूक झाल्यास पॉलिसीधारकाने कुठे तक्रार नोंदवावी यासारखी माहिती या अभियानात अधोरेखित करण्यात येणार आहे.

आपल्या ग्राहक वर्गात जनजागृती निर्माण करण्याव्यतिरिक्त बजाज अलियान्झ लाईफ इन्शुरन्सच्या वतीने सुरक्षित राहण्याच्या अनुषंगाने जनतेला/ग्राहक वर्गाला काही टिप्स देण्यात येत आहेत:

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तिकडे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इत्यादी केव्हायसी दस्तावेज कधीही देऊ नयेत. बजाज अलियान्झ लाईफ कोणत्याही व्यवहाराकरिता ग्राहकांकडे मूळ दस्तावेजांची मागणी करत नाही.
  • कोऱ्या प्रस्ताव अर्जावर स्वाक्षरी करू नये आणि जर कोणत्याही एजंट / कर्मचाऱ्याने तशी मागणी केल्यास टोल फ्रि क्रमांक 1800-209-4040 वर विमा पुरवठादाराला कळवावे किंवा तक्रार customercare@bajajallianz.co.in वर लिहून पाठवता येईल.
  • विमा एजंटना रोख रकमेत प्रीमियम भरणा करण्याचे टाळा. जर तुम्हाला पहिला हफ्ता रोखीने भरावा लागणार असेल तर जवळच्या अधिकृत बजाज अलियान्झ लाईफ शाखेत जा आणि मूळ प्रीमियम भरणा पावतीवर बजाज अलियान्झचा शिक्का घेण्यास विसरू नका.
  • तुमची वैयक्तिक किंवा पॉलिसीशी निगडीत माहिती तसेच व्यवहाराचे ओटीपी कोणत्याही अनोळखी स्त्रोत / कॉलरला सांगू नका.
  • तुमच्या विमा एजंटकडे खात्याचे लॉगइन आयडी आणि पासवर्ड उघड करू नका. कोणत्याही वित्तीय व्यवहारासाठी कोरा धनादेश जारी करू नका.
  • कोणत्याही कॉलरकडे तुमच्या पॉलिसीची माहिती/अन्य माहितीचा भाग उघड करू नका.
  • एखाद्या कॉलरने सध्याची पॉलिसी सरेंडर करून अतिरिक्त बोनस किंवा जास्तीच्या लाभाचे आमिष दाखवल्यास त्याला बळी पडू नका.

Back to top button
Don`t copy text!