दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये केलेली मारहाण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना चांगलीत भोवली. काल आव्हाडांना वर्तक पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे.
आज सकाळी दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मॉलप्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता त्यांना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मॉलमध्ये राडा झाल्यानंतर काल त्यांना वर्तक पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर आव्हाड यांच्या वकिलांनी पुन्हा एकदा जामीनाचा अर्ज केला होता. त्यानंतर आता 15 हजाराच्या जातमुचलक्यावर ठाणे कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झाला आहे. इतर 10 कार्यकर्त्यांचाही जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाच्या समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरवात केली आहे.