स्थैर्य, ठाणे, दि.२७: पालघरमधील साधू हत्याकांड (गडचिंचले झुंडबळी) प्रकरणात अटक झालेल्या ५३ जणांना ठाण्यातील विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. एप्रिल महिन्यात पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता.
पालघरमध्ये जमावाने केलेल्या दोन साधूंसह तिघांच्या हत्येप्रकरणी राज्य सरकारकडून गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते. त्यामध्ये राज्य सरकारने या प्रकरणात पोलिसांवर काय कारवाई केली याची माहिती दिली होती. सरकारने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 15 पोलिसांच्या पगारामध्ये कपात करण्याची शिक्षा देण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिका-याला निलंबित केले आहे, तर दोन जणांना सेवा निवृत्तीवर पाठवले आहे.
भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही : सुप्रिया सुळे
गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावक-यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. 16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती.