वर्ये पूलाच्या वळणाला कचऱ्याचा विळखा परिसरात दुर्गधी, आरोग्याला धोका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

वर्ये पूलाच्या वळणाला कचऱ्याचे ढीग (छाया – श्रीरंग काटेकर)

स्थैर्य, सातारा, दि.१६: सातारा पुणे जुना हायवे मार्गवरील वर्येपुलाच्या वळणावर सध्या जिकडे तिकडे कचÚयाचे ढिग साचल्याचे दिसून येत आहे याठिकाणी नेहमीच ये जा करताना काही महाभाग आपल्या घरातील साचलेला कचरा व काही हाॅटेल व्यसाईक रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत दरवेळी या ठिकाणी साचलेला कचरा स्वच्छ केला कि पुन्हा हेच महाभाग या ठिकाणी कचरा टाकून परिसर अस्वच्छ करीत आहेत अषा महाभागावर संबधित यंत्रणेकडून कडक कारवाईची अपेक्षा आहे यामार्गवरुन दररोज हाजारो वाहने व नागरिक ये जा करीत आहेत दुशित परिसरामुळे येथील नैसगिक सौदर्याला बाधातर होतच आहे परंतू येथे टाकलेल्या कचरा हा पाऊसामुळे कुजत असून परिसरात दुर्गधीबरोबरच नागरिकाच्या आरोग्याला हि धोका निर्माण होत आहे सध्या कोरोनाचे महाभंयकर संकटाने नागरिक भयभीत झाले आहेत त्यात मार्गवरील दुर्गधीयुक्त कचÚयाची भर पडली आहे कचÚयामध्ये बÚयादा मासाहाराचे तुकडे व मृतप्राणी असल्याने अनेक भटक्या कु़त्र्याचा या ठिकाणी सुळसुळाट झाल्याचे दिसून येते येथील परिसरातील स्वच्छता व्हावी हि नागरिकाची मागणी आहे.

शेजारी असलेले नदीपात्रात वाऱ्याने कचरा जात असल्याने नदीपात्र दूशित होत आहे कचरा टाकणाÚयानी सामजिक भान जोपासने गरजेचे संुदर परिसराची अस्वच्छता करणाÚयावर कडक कारवाई व्हावी तसेच येथे सी.सी.टी.व्ही काॅमेरे बसवावेत 

– श्रीरंग काटेकर सातारा


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!