दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२२ । सातारा । राज्यातील कांदा विक्रीची प्रमुख बाजारपेठ तसेच माऊलीच्या पालखीच विश्राम स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील सातारा लोणंद राज्य मार्गावरील लोणंद बसस्थानक सद्या मोठ मोठ्या खड्यामुळे पाण्यात गेलं आहे.या पाण्यातून या बस स्थांनकाला बाहेर काढणं गरजेचं आहे या साठी या मतदार संघाचे जननायक आमदार मकरंद आबापाटील यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशीमागणी लोणंद ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
सातारा जिल्ह्यातील अनेक प्रमुख बस स्थानकाचा जीर्णोध्दार झाला मात्र लोणंद हे महत्वाचे बसस्थानक समस्यांनी ग्रस्त राहिले आहे
प्रशस्त जागा असूनही हे बस्स्थानक मात्र दुरावस्थ आहे.
एसटी बस आगारात पहिल्याच पावसात पाण्याची मोठमोठी डबकी साचली आहेत. त्यामुळे या डबक्यातील साचलेले खराब पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत आहे. गेले कित्तेक दिवस आगारात मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि ते न भरल्याने आता या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. प्रवाशांसोबत बस चालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुणे सांतारा शिरवळ फलटन शहरांना जोडणाऱ्या या मार्गावरील लोणंद एस टी बस आगार हे एक महत्त्वाचे बस स्थानक आहे. मात्र गेल्या कित्तेक दिवसांपासून या आगारात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये आता पावसाचे पाणी साचत आहे. या ठिकाणी येणाऱ्या बस या खड्ड्यांतून जात असताना अनेक प्रवाशांच्या अंगावर खराब आणि गढूळ मैलापाणी उडत आहे.