स्थैर्य, सातारा, दि. 12 : भोंदवडे-पाटेघर हा मुख्य रस्ता जरी असला तरी बाराजपेठेसाठी बहुतांश ग्रामस्थ हे परळी येथे येतात. परंतु पाटेघर येथून येताना लागणाऱ्या परळी फाटा बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे.
पाटेघर, आलवडी, सावली तसेच अनेक गावांना परळी येथे येण्यासाठी भोंदवडे येथील मार्गापेक्षा परळी फाटा येथून सोईस्कर पडते परंतु बसस्थानकाची दुरावस्था तसेच पावसाची सुरू असलेली रिपरिप यामुळे प्रवाशांना अडचणी येत आहेत. बसस्थानकामध्ये तळीरामांनी आपला बस्तान बसल्याचे चित्र दिसते जिकडे-तिकडे दारूच्या बाटल्यांचा खच तसेच पाऊस जोरात आला तर आपली गुरेढोरे बस स्थानकातच आडोशाला उभी केल्याने बस स्थानकात त्यांची घाण आहेच. तसेच या घानी मुळे डासांचे प्रमानही असल्याने बस स्थानकाची स्वच्छता करून तळीरामांना अटकाव घालण्याची मागणी ग्रामस्थांकडून तसेच प्रवाशांकडून होत आहे.