अभिमन्यू कॉर्नर ते रुई रस्त्याची दुरावस्था


दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । बारामती । बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठान नजीक असलेल्या अभिमन्यू कॉर्नर ते रुई रस्त्याची पाऊसामुळे मोठया प्रमाणावर दुरावस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

या परिसरात चिखलमय रस्ता झाल्याने नागरिकांना चालणे तर अवघड झाले आहे व त्याच बरोबर वाहने घसरून अपघात होत आहेत
विद्या प्रतिष्ठान कडे जाणारे विद्यार्थी यांना सदर रस्ता बदलून रुई गावातून प्रवास करावा लागतो त्याच प्रमाणे या परिसरात घरे बांधलेल्या नागरिकांना नाईलाज म्हणून कसरत करत व अपघात होऊ नये म्हणून जीव मुठीत धरून रस्त्यावरून जाणे येणे करावे लागते.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाला सांगितले परंतु त्याकडे दुर्लश करण्यात आले त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सदर रस्त्याचे नगरपरिषद च्या माध्यमातून डांबरीकरण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!