आझाद समाज पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ एप्रिल २०२२ । सातारा ।  करंजे तर्फ सातारा येथील सर्व्हे नंबर २५९/१/२ मधील ९१०० चौ.मी. हे क्षेत्र एनए केले असून ते रद्द करण्यात यावे. हे क्षेत्र एनए करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व्हे नंबर २५९/१/२ मधील ९१०० चौ.मी. हे क्षेत्र एनए करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तात्पुरती मंजुरी दिली आहे. या क्षेत्राचा सादर केलेल्या प्लॅन व नकाशामध्ये कोठेही रोडबाबत नाहरकत दाखल व रोड दिसत नाही. सदर ज्या क्षेत्राला कण्हेरचा उजवा कालवा कॅनॉलचा रोड दाखवण्यात आला आहे.

याबाबत अधिकारी व संबंधित जागा मालकाचे साटेलोटे आहे. खोटी कागदपत्र सादर करणाऱ्या व्यक्तीस व परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. उपोषणास जिल्हाध्यक्ष आतिष कांबळे, मंगेश आवळे, मुकेश मदाळे, सूरज भैलुमे, सनी काकडे, संजय काळिंबे आदी बसले आहेत.


Back to top button
Don`t copy text!