
![]() |
निमसोड : डॉ. शंकर जाधव यांचा सत्कार करताना माजी सभापती संदिप मांडवे समवेत प्रा. बंडा गोडसे, विजय काळे, श्रीकांत देवकर आदी (छाया : समीर तांबोळी )
|
स्थैर्य, कातरखटाव , दि.२: कोरोना संसर्गजन्य आजाराच्या काळात सर्वसामान्य लोकांना प्राचिन आयुर्वेदिक उपचार पध्दतीने चांगला दिलासा दिला आहे असे मत खटाव पंचायत समितीचे माजी सभापती पै. संदिप मांडवे यांनी व्यक्त केले.
निमसोड (ता. खटाव) येथील शिवमल्हार आयुर्वेदिक उपचार केंद्राचे संचालक डॉ. शंकर जाधव यांनी कोरोना कालावधीत केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा मांडवे मित्र मंडळ व येरळा परीवाराच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वडूजचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. बंडा गोडसे, बाजार समितीचे माजी सभापती विजय काळे, रा.स.प. चे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, धनंजय क्षीरसागर, नानासाहेब घाडगे, प्रतापराव माने, भिकूनाना देवकर, शशिकांत देवकर यांची उपस्थिती होती.
मांडवे म्हणाले, डॉ. जाधव हे निमसोड सारख्या ग्रामीण भागात अनेक वर्षे आयुर्वेद उपचार करण्याबरोबर वेगवेगळ्या वनस्पतीच्या माध्यमातून औषध निर्मितीही करत आहेत. त्यांच्यामुळे निमसोड परीसरासह खटाव-माण तालुक्यातील रुग्णांची चांगली सोय होत आहे. कोरोना काळात त्यांनी लांबून येणार्या रुग्णावरदेखील चांगले उपचार केले. त्याचबरोबर समोर येणार्या असंख्य लोकांना कोरोनासंदर्भात मोफत मार्गदर्शन केले. प्रा. गोडसे यांनीही शिवमल्हार आयुर्वेद उपचार केंद्राच्या उपक्रमांचे कौतुक केले.
देवकर यांनी प्रास्ताविक केले. क्षीरसागर यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. जाधव यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन उपस्थितांचे आभार मानले.