दैनिक स्थैर्य | दि. १३ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
श्री क्षेत्र लाटे (ता. बारामती) येथील आईसाहेब महाराज पालखी सोहळा लाटे ते किरकसाल (ता. माण) आणि पुन्हा किरकसाल ते लाटे असा पायी सोहळा परतीच्या मार्गावर शेवटच्या मुक्कामी रविवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी भाडळी बु., ता. फलटण येथे विसावला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने मनोभावे स्वागत करण्यात आले.
यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावरून टाळमृदंगाच्या गजरामध्ये मुख्य चौकामध्ये पालखी आणण्यात आली. पालखीमधील आईसाहेब महाराजांच्या पादुका आणि तैलचित्र यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. स्वागत समारंभानंतर त्याठिकाणी ह.भ.प. श्री. तुषार महाराज भिसे यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले. त्यानंतर आरतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री. पोपटराव मारुती भोईटे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री. मोहनराव डांगे (चेअरमन – मातोश्री विकास सेवा सोसायटी मर्या भाडळी बु),श्री.सागर डांगे (फलटण तालुका कृषी अधिकारी), श्री. हनुमंत सोनवलकर (पोलीस पाटील), श्री. हनुमंत शिरतोडे (मा. उपसरपंच), श्री.अशोक माने (अध्यक्ष- तंटामुक्त समिती), श्री. दत्तात्रय डांगे (मा.उपसरपंच), श्री. वसंतराव डांगे, श्री. दत्तात्रय सावंत, श्री. आबासाहेब माने, श्री. चंद्रकांत डांगे, श्री. अजयकुमार डांगे, श्री. सुनिल डांगे, श्री. अशोक डांगे, श्री. हरिदास सावंत, श्री. विजय घाटे, श्री. सचिन शिरतोडे, श्री. अमोल डांगे, श्री. राम भोईटे, श्री. ऋषिकेश भोईटे, श्री. किशोर माने, श्री. रमेश डांगे, श्री. तानाजी सावंत, श्री. प्रमोद डांगे, श्री.अजित डांगे, श्री.धिरज डांगे, श्री. जयदीप डांगे, श्री. धर्मेंद्र शिरतोडे, स्मित डांगे, पवनराजे डांगे, प्रशांत डांगे, अनिकेत डांगे, ह.भ.प.नाना महाराज शेंडे, आदेश डांगे, सुरज गोरे, साईराज डांगे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, नेहरु युवा मंडळ, जाणता राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ह.भ.प.स्वप्नील महाराज शेंडे (अध्यक्ष – ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, भाडळी बु.) यांनी स्वागत केले तसेच चि. संकेत डांगे यांनी आभार मानले.