दैनिक स्थैर्य | दि. १ एप्रिल २०२३ | फलटण |
महिला आर्थिक विकास महामंडळ ओमसाई लोकसंचलित साधन केंद्र फलटण यांच्या वतीने तरडगाव ग्रामपंचायत येथे ‘घर दोघांचे’ हे जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमास तरडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. जयश्री अनिल चव्हाण, उपसरपंच श्री. गायकवाड सर, अध्यक्षा रेखा जाधव उपस्थित होत्या. या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्ज्वलन करण्यात आले.
सरपंच सौ.चव्हाण मॅडम व मान्यवरांचे गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. सौ. चव्हाण मॅडम यांनी बचतगटांना सहकार्य करण्यास सांगितले. सहयोगिनी सोनाली पाटोळे मॅडम यांनी ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ व ‘घर दोघांचे’ या जनजागृती अभियानाविषयी महिलांना माहिती सांगून मार्गदशन करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सीआरपी सौ. प्रियांका गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.