दैनिक स्थैर्य । दि.२४ मार्च २०२२ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या मार्गदर्शनानुसार स्व. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी येथे कौटुंबिक हिंसाचारपासून महिलांचे संरक्षण आणि हुंडा बंदी कायदा विषयी जागरुकता शिबीर संपन्न झाले.
या शिबीरामध्ये ॲड. जान्हवी जोशी यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व हुंडा बंदी कायदा या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबतही माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक जीवन बोराटे यांनी केले. या शिबीरास महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.