
दैनिक स्थैर्य । दि.१२ जानेवारी २०२२ । ढवळ । येथील ग्रामपंचायत सदस्य श्री. विजयकुमार लोखंडे यांनी वाढदिवसानिमित्त आदरणीय श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर सभापती, पंचायत समिती फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली ढवळ गावातील नागरिकांचा कोरोना विषाणूपासून बचावासाठी गावामध्ये मास्क व सानिटेझर वाटप केले. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणकोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे त्यांचे तालुक्यातून कौतुक करणेत येत आहे. ग्रामपंचायत सदस्य श्री. विजयकुमार लोखंडे हे ढवळ गावातील नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात, त्यामुळे त्यांची स्वतः ची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोणाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला आहे. ढवळ मध्ये कोरोनाचे संशयित नसले तरी शासन प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. त्या पार्शवभूमीवर गावामध्ये नागरिकांच्या कोरोना विषाणू पासून बचावाकरिता सदस्य श्री विजयकुमार लोखंडे यांनी स्वतच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून मास्क व स्यानिटायझर वाटप केले आहे.