गरजूंना साहित्य वाटप प्रसंगी प्रतापराव गोरे व मान्यवर. (छाया : समीर तांबोळी) |
स्थैर्य, कातरखटाव, दि. ३० : वाकेश्वर (ता. खटाव) येथे कटगुण येथील ज्ञानप्रबोधिनी सामाजिक संस्थेच्या वतीने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शारीरिक स्वच्छता, संतुलित आहार याबाबत जनजागृती करण्याबरोबर जिल्हाधिकार्यांच्या आपत्कालीन योजनेतून गोगरीबांना दसरा-दिवाळी निमित्त साहित्य वाटप करण्यात आले.
तंटामुक्तीचे अध्यक्ष तथा सरपंच प्रतिनिधी नामदेव फडतरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष शंकरराव फडतरे, माजी सरपंच पंढरीनाथ खुळे, आनंदराव फडतरे, रामराव फडतरे, दत्ता फडतरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव गोरे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास ह.भ.प. रघुनाथ फडतरे, अशोकराव फडतरे, रामचंद्र फडतरे, गोरख फडतरे, गोरख कुंभार, संजय गुरव, नंदकुमार शेडगे, दादासाहेब साठे, सुखदेव गुजले, सदाशिव मदने, वसंत सुतार, अवधुत साठे, निवृत्ती साठे, जगुबाई फडतरे, सुभद्रा पाटोळे, रुपाली जावीर, रेश्मा जावीर, लिलाबाई नामदास, वैशाली कंठ आदी उपस्थित होते. धनंजय क्षीरसागर यांनी सुत्रसंचालन केले. सुरज भांडवलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद वाचनालयाचे पदाधिकारी, येरळा परिवाराच्या कार्यकत्यांनी विशेष परिश्रम घेतले.