स्थैर्य, नागपूर, दि.२६: म्युकरमायकोसिसच्या (काळी बुरशी) वाढत्या प्रादुर्भावाविषयी ग्रामीण भागात कलापथकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
कोरोना लसीकरण, कोविड नियमांचे पालन करणे, काळ्या बुरशीपासून संरक्षण करण्यासाठी पथनाट्यद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
ग्रामीण स्तरावर जनजागृती व्हावी ह्याकरिता भारत सरकारच्या सूचना व प्रसारण मंत्रालय, क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो, नागपूर, गीत व नाटक विभाग (महाराष्ट्र व गोवा ) तर्फे नागपुर जिल्ह्यातील उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यात राबविण्यात येत आहे.
या अभियातंर्गत बहुमाध्यम प्रदर्शनाद्वारे आणि गीत नाटक चमू, राष्ट्रभाषा परिवार सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत मानोरा येथे पुष्पक भट व ओमकार लांडगे यांनी मिथुन माटे, प्रभारी सरपंच, ग्रां. प सदस्य प्रबोध गोमकर, उत्तम भरडे, आणि इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्कृष्टरित्या पथनाट्य सादर केले.