दैनिक स्थैर्य | दि. ०९ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
आरोग्य विभाग सातारा व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र फलटण यांच्यामार्फत जागरूक पालक, सुद़ृढ बालक अभियान कार्यक्रम गुरुवार, दि. ०९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत आयोजित केला आहे. हा कार्यक्रम श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदीर, विद्यानगर, ता. फलटण येथे होणार आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फलटण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर संस्थेच्या चेअरमन श्रीमंत सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर असणार आहेत. यावेळी माजी नगरसेविका सौ. दीपालीताई शैलेश निंबाळकर, नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.