
दैनिक स्थैर्य | दि. ०९ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
आरोग्य विभाग सातारा व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र फलटण यांच्यामार्फत जागरूक पालक, सुद़ृढ बालक अभियान कार्यक्रम गुरुवार, दि. ०९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत आयोजित केला आहे. हा कार्यक्रम प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, मलठण, फलटण येथे होणार आहे. फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
कार्यक्रमास फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, सौ. मदलसा कुंभार, सौ. मीनाताई नेवसे, सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर, प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.