संवेदनशील मनाचा जाणता राजा – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ फेब्रुवारी २०२२ । सातारा । जन्ममृत्यूशी झगडणारे मानवी जीवन अनेक वळणांवर सुख – दुःखाशी सामना करताना , घडणाऱ्या अनेक असंस्मरणीय क्षणाच्या सुखात व दुःखात राहून जीवन जगत असतो . अशाच एक जीवनाचा अनमोल क्षण म्हणजे वाढदिवस वर्तमान काळाला स्मरून भविष्याचा वेध घेण्यासाठी आतुरलेले मानवी जीवन , जीवनाच्या वाटचालीत अनेक अपेक्षा व स्वप्नाचे ओझे घेवून वाटचाल करीत असतो . यातील एक सुवर्ण क्षण म्हणजे वाढदिवस . मने जपणारा एक संवेदनशील राजा अशी प्रतिमा जनमाणसात कृतीतून सिध्द करणारे .श्री . छत्रपती .खा.उदयनराजे भोसले यांचा दि . २४ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा वाढदिवस म्हणजे तमाम सातारावासियांसाठी आनंद , उत्सव व चैतन्याचा दिवस असल्याचे दिसून येते . एक धडाडीचे नेतृत्व सातारच्या ऐतिहासिक भूमित श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या रूपात लाभले आहे . स्पष्टपरखड भूमिका घेणारा हा जाणता राजा दिनदुबळ्या व सर्वसामान्य जनतेच्या न्यायी प्रश्नासाठी ज्यावेळी पुढाकार घेतो त्यावेळेला अनेक वेळा सत्ताधाऱ्यांशी संघर्ष घेण्याची वेळ येते . त्यावेळेला नेहमीच खा . श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जनमाणसाच्या प्रश्नांना अधिक वेळा महत्त्व दिल्याचे दिसून आले आहे . समाज कारणातून राजकारण आणि राजकारणातून सत्ता संपत्ती निर्माण करणाऱ्या ढोंगी , मतलबी सत्ताधिशांना वेसन घालण्याची धमक फक्त छ . उदयनराजेंच्या  नेतृत्वातच आहे . शाब्दीक खळबळ माजवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या अनेकांना त्यांनी जमिनीवर  आणण्याचे धाङस दाखविले आहे . जनमाणसातील या जाणता राजाला गोरगरीब दिनदुबळ्या समाजाची दुःखे माहित आहेत . म्हणूनच ते अनेक वेळा राजा असूनही या समाज बांधवांच्या सुख – दुःखात सामिल झाल्याचे दिसून येते . अन्यायी प्रृवत्तीशी लढा देताना अनेक वेळा आलेली संकटे त्यानी आपल्या धैर्य साहसवृत्तीने दूर केली आहेत . यामुळे सामान्यातील सामान्य घटकालासुध्दा हा जाणता राजा आपला कुटुंबातील एक प्रमुख घटक वाटतो . ही आपुलकीची भावना जनमाणसात खाश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निर्माण केली आहे . निवडणूका असू अगर नसू मी अखेर जनतेचा सेवक ही भावना कायम ठेवून जनहिताला प्राधान्य ही भूमिका घेवून आजवर केलेल्या कार्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढतच आहे . त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी दखल घेतली आहे . देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी , माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व अनेक केंद्रीय मंत्री यांनी खा.श्री.उदयनराजे भोसले यांच्या धाडसी व धडाडीचे नेतृत्वाची प्रशंसा केली आहे . छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेले   श्री . छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या जीवन प्रवासात राजर्षी शाहू महाराज , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले , कर्मवीर भाऊराव पाटील या थोरामोठ्यांच्या विचारातून प्रेरणा घेवून सामाजिकतेचा वसा जपला आहे . राजकीय जीवन प्रवासात जीवन जगताना स्वार्थी , ढोंगी , मतलबी भूमिकेला मूठ माती देवून सामान्य माणसाचे हित जपण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे म्हणूनच त्यांनी जनतेच्या हृदयातील हृदयस्थान निर्माण केले आहे .. सामाजिक बांधिलकीची भावना या जाणता राजाने ठेवून समाजातील अनेक घटकांना निरपेक्ष भावनेने सहकार्य केले आहे . शैक्षणिक , सांस्कृतिक , सहकार , क्रिडा , राजकीय क्षेत्रातील अनेकांना सढळ हातांनी मदत करताना दिलेली अनमोल साथ यामुळे अनेकांचे जीवनमान उंचावले आहे . सुखदुःखाच्या या जीवनप्रवासात प्रत्येक घटकाला  श्री . छ . उदयनराजे भोसले हे आपलेच वाटतात हीच भावना सर्व काही सांगून जाते . बेधडक व प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करताना श्री . छ . उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही परिणामाची तमा बाळगली नाही यामुळे हा जाणता राजा एक स्वाभिमानी विचाराचा एक धगधगती मशाल आहे . स्वकियाबरोबर विरोधकानीही अनेक वेळा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला . परंतु  श्री . छ . उदयनराजे भोसले यांनी निरपेक्ष भावनेने कार्य केले म्हणून त्यांच्या पाठीशी जनता ही परमेश्वर रूपात उभी राहिली आहे . हे अनेक वेळा सिध्द झाले आहे . अखेर स्वार्थी , ढोंगी पुढारपणातील लांडग्याच्या कळपातील कळपांनी कितीही झेप घेतली तरी वाघाच्या झेपीची तुलना त्यांना करता येत नाही . श्री . छ . उदयनराजे भोसले हे जनतेच्या हृदयातील एक वाघ आहेत याची जाणीव अनेकांना आहे . अशा या खंबीर व दिलदार मनाचा जाणता राजाच्या नावातच शक्ती , सामार्थ्य व चैतन्य सामावलेले आहे . धैर्य , साहस हे गुण  श्री . छ . उदयनराजे भोसले यांच्या अंगी असल्याने येणारा कोणत्याही संकटाशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे . अशा नेतृत्वाचा वाढदिवस म्हणजे सातारावासियांना भाग्याचा क्षण आहे . श्री.छ.उदयनराजे भोसले हे आहेत तरी कसे याबाबत अनेकांची वेगवेगळी मते असू शकतील परंतु एक दिलदार व संवेदनशील जाणता राजा याबाबत मात्र एकमतच आहे . म्हणूनच या जाणता राजाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
– श्रीरंग काटेकर पत्रकार सातारा

Back to top button
Don`t copy text!