पुरस्कार हा लेखनाचे प्रयोजन नको तर परिणाम असायला पाहिजे – किशोर बेडकिहाळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ ऑगस्ट २०२२ । सातारा । लेखकाने निर्भिडपणे व्यक्त होणे गरजेचे आहे. योग्य भूमिका घेऊन निष्ठेने त्या विचाराना धरुन व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. पुरस्काराने लेखकावरील समाजबांधणीची जबाबदारी वाढते. पुरस्कार हे लेखनाचे प्रयोजन नव्हे तर परिणाम असायला पाहिजे असे ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक किशोर बेडकिहाळ अश्वमेध ग्रंथालय सातारा मार्फत दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ अक्षरगौरव साहित्य पुरस्कार वितरण समारंभ बोलताना म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सौ. सुनिताराजे पवार, अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक रविंद्र भारती- झुटिंग, कार्याध्यक्ष साहित्यिक डॉ. राजेंद्र माने हे प्रमुख उपस्थिती होते.

पुरस्कार वितरण करताना किशोर बेडकिहाळ, सुनीताराजे पवार, रविंद्र भारती-झुटिंग, डॉ. राजेंद्र माने, शशिभूषण जाधव व गौरव इमडे.

यावेळी बोलताना सुनिताराजे म्हणाल्या साहित्यात माणूस हा महत्वाचा आहे. माणसाचे सत्व राखणारे लिखान या पुस्तकामधून सामोरी आले. गेली दहा वर्षे अश्वमेध ग्रंथालय हे अक्षरगौरव साहित्य पुरस्कार देत आहे. यातले सातत्य कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातले लेखकाना हे पुरस्कार प्रेरणा देतात.

पुरस्कार वितरण करताना किशोर बेडकिहाळ, सुनीताराजे पवार, रविंद्र भारती-झुटिंग, डॉ. राजेंद्र माने, शशिभूषण जाधव व गौरव इमडे.

यावेळी प्रास्तविक करताना ग्रंथालयाचे संस्थापक रविंद्र भारती- झुटिंग यांनी ग्रंथालयांच्या उपक्रमांची माहिती दिली. कार्याध्यक्ष लेखक डॉ राजेंद्र माने यांनी पुरस्कारामागची भूमिका विषद करताना दरवर्षी पुरस्कारासाठी येणाऱ्या ग्रंथांची संख्या वाढती आहे. या वर्षी तीन विशेष पुरस्कारांची संख्या वाढवली त्याचबरोबर डॉ. श्रीकांत कारखानीस यांचे स्मृत्यर्थ आरोग्य विषयक ग्रंथाला अक्षरगौरव साहित्य विशेष पुरस्कार देत आहोत असे सांगितले.पुरस्कारांसाठी परिक्षक म्हणून सचिन प्रभुणे व कांता भोसले यांनी काम पाहिले. यावेळी दि. बा. पाटील यांच्या नोटबंदी, डॉ तुकाराम रोंगटे यांच्या आदिवासिंचेही डॉ बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथांना राज्यस्तरीय प्रमुख अक्षरगौरव पुरस्कार. राजन लाखे यांच्या गुंता, उद्धव कानडे व सदाफुले यांच्या कविवर्य नारायण सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ आणि प्रकाश जडे यांच्या वात्सल्यसुक्त या ग्रंथाना विशेष ग्रंथ पुरस्कार देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील लेखकाना देण्यात येणारे प्रेरणा पुरस्कार राजेंद्र वाकडे यांच्या भूतान एक आनंदयात्रा आणि डॉ सुभाष वाघमारे यांच्या संविधानाचे स्वप्नातील गाव व मनिषा शिरटावले यांच्या मन सांधते आभाळ या ग्रंथाना देण्यात आले. या वर्षीपासून देण्यात येणारा डॉ श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ आरोग्य विषयक ग्रंथाला देण्यात येणारा अक्षरगौरव पुरस्कार दीपक प्रभावळकर यांच्या कोविडायन -डायरी ऑफ पॅन्डॅमिक ला प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कविता प्रभुणे यांनी केले तर आभार ग्रंथालयाचे अध्यक्ष शशिभूषण जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला शिरीष चिटणीस, प्रा. श्रीधर साळुंखे, सुहास साळुंखे, प्रदीप कांबळे, डॉ सुभाष आगाशे, डॉ संदीप श्रोत्री, श्री.बडदरे, दत्तात्रय चाळके, गौरव इमडे, राजेंद्र घाडगे, डॉ श्याम बडवे, मदन देशपांडे, श्री संजय साबळे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!