दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । फलटण । गोपाल कृष्ण मंदिर ट्रस्ट गिरवी या मंदिराचे उत्तराधिकारी जयंत देशपांडे यांना त्यांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन भागवत धर्माचा प्रचार केला त्या निमित्त त्यांचा सामाजिक बांधिलकी म्हणून फलटण तालूका वारकरी संघटनेने नुकताच समाज भूषण पूरस्कार देऊन सन्मान केला.
सकल संत सांप्रदायिक व अध्यात्मिक व सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने फलटण येथे धार्मिक महोत्सवाचे दिनांक १३ जुलै ते १० सप्टेंबर या मध्ये आयोजन केले असून या मध्ये ह.भ.प. भागवताचार्य बंडातात्या कर्हाडकर यांचे श्रीमद भागवत कथा ज्ञानाचे आयोजन केले असून या समारंभात नुकताच जयंतराव देशपांडे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
हा पुरस्कार प.पू. श्री. सेवागिरी स्थानाचे स्वामी सुंदरगिरी महाराज पुसेगाव व गोंदवले संस्थानचे विश्वस्त डॉ. अवधुत गुळवणी, भागवताचार्य ह.भ.प. अनंतशास्त्री मुळे, सिध्दीविनायक मंदिरचे ह.भ.प. केशव महाराज जाधव यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आला.
यावेळी जयंत देशपांडे यांना ११ सुवासिनींनी प्रारंभी औक्षण तसेच धान्यतुला करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास सिध्देविनायक मंदिराचे सर्व विश्वस्त, वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी तसेच फलटण, सातारा व् पुणे येथून निमंत्रित उपस्थित होते. वारकरी संप्रदायाचे व सिध्दीविनायक मंदिराचे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.