दैनिक स्थैर्य । दि. २३ जानेवारी २०२३ । मुंबई । 22 जानेवारी रोजी कापडगाव या ठिकाणी( CA) लालासो बाळू धायगुडे यांचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या च्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय समाज पक्ष महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष ह. भ. प. निकिता ताई सूळ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, विजय गुळदगड( MSEB) अधिकारी यांच्या हस्ते सत्कारमूर्तींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष वरिष्ठ नेते संतोष जी ठोंबरे फलटण तालुका युवक अध्यक्ष निलेश लांडगे, कापडगाव चे उपसरपंच रामभाऊ केसकर, फलटण तालुका उपाध्यक्ष महादेव कुलाळ यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांनी सांगितले.तसेच तरडगाव जिल्हा परिषद गट पूर्ण ताकतीने लढवा असे सुतोवाच केले तसेच येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचे ध्येय धोरण तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. राष्ट्रीय समाज पक्ष मा.कॅबिनेट मंत्री महादेव जानकर साहेब यांनी पक्षाची स्थापना करून सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचे काम केले तसेच उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी नेण्याचे काम राष्ट्रीय समाज पक्ष करत आहे.
यावेळी बोलताना विजय गुळदगड यांनी युवकांनी या क्षेत्राकडे जास्तीत जास्त संख्येने वळावे. त्यांचा जीवन प्रवास खडतर परिस्थिती वर मात करून इथपर्यंत पोहोचले असे मार्गदर्शन केले.
तसेच यावेळी महिला आघाडी उपाध्यक्ष ह. भ. प. कीर्तनकार निकिता ताई महाराज सूळ यांनी मनोगत व्यक्त करताना इथपर्यंत चा प्रवास सांगितला माझ्यासाठी माझा गुरु हा भाऊ हा नितीन सूळ आहे असेही तिने मनोगत मध्ये व्यक्त केले. तसेच मला महिला उपाध्यक्ष निवड करून मी माझ्या वतीने जास्तीत जास्त संख्येने तालुक्यामध्ये पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असेही सांगितले.त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर (CA) लालासो धायगुडे यांनी सत्काराला उत्तर देताना CA होण्यापर्यंत कसे पोहोचलो याचा अनुभव त्यांनी सांगितला त्यांनी तरुण विध्यार्थना मार्गदर्शन कधीही फोन करा मी मार्गदर्शन करण्यास तत्पर असेल असे सांगितले तसेच त्यांनी आपण मोलमजुरी करून इथपर्यंत चा प्रवास कसा गाठला असे सांगत असताना उपस्थित लोकांना त्यांचा मनोगतातून उर्जित अशी प्रेरणा मिळाली हा प्रवास सांगत असताना ते भावुक झाले. तरी त्यांच्या पासून तरुणांनी बोध घ्यावा. राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डॉ. गणेश कोकरे, खंडाळा नेते सागर जानकर, विजय ठोंबरे,संकेत कारंडे मलवडी, विशाल माडकर, सागर माडकर,दादासो सूळ डोंबाळवाडी ग्रा. सदस्य, बनसोडे महाराज,सुनील करे मा. सरपंच, विठ्ठल खताळ, दीपक खताळ, तेजस कचरे, लालासो केसकर, अनिल केसकर,गडदे महाराज, रोहन धायगुडे, समर्थ धायगुडे, कचरे, रणजित कुलाळ, यावेळी तरडगाव जिल्हा परिषद गट प्रमुख नितीन सूळ कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल मिठाई सर्वाना वाटली. यावेळी मनोगत व्यक्त करताना गरीब कुटूंबातून CA ची परीक्षा उत्तीर्ण झाले यातून तरुणांनी बोध घ्यावा येणाऱ्या काळात आम्ही तरडगाव ज़िल्हा परिषद गटात जास्तीत जास्त तरुणांनी आगामी निवडणुकी च्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाला सहकार्य करावे मा. महादेवजी जानकर जानकर साहेब यांच्या विचार धारेला पुढे नेण्यासाठी जास्तीत लोकांनी सहकार्य करावे यावेळी तरडगाव गण प्रमुख दादासाहेब केसकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.