भारत शिवराम बोडरे आदर्श कृषी अधिकारी पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२२ । फलटण । फलटण पंचायत समितीचे कृषी अधिकारी भरत शिवराम बोडरे हे सन२००३ खंडाळा पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी पदावर हजर झाले.त्यांचे सन २००९ मध्ये कृषि अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांनी कृषि अधिकारी पदावर २०१५ पर्यंत खटाव या ठिकाण कामकाज पाहिले आणि २०१५ पासून पंचायत समिती फलटण येते ते कृषि अधिकारी पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या १९ वर्षाच्या सेवा काळात त्यांनी शेतकरी केंद्रबिंदु मानून आपली उत्कृष्ठ सेवा पार पडली. त्याच्या कार्याची जिल्हा परिषदे मार्फत नोंद घेण्यात आली आणि १ जुलै ला कृषि दिनी त्यांना आदर्श कृषि अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले.

भारत शिवराम बोडरे यांना पुरस्कार मिळाले बद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे पवार, कृषि अधिकारी नवनाथ फडतरे, विस्तार अधिकारी अप्पासो गौंड, खुंटे ग्रामपंचायतचे माजी सरपंच शरद खलाटे यांनी व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!