
दैनिक स्थैर्य । दि. १९ जानेवारी २०२३ । फलटण । फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटीद्वारे फलटण येथील महाराजा मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटीस महाराष्ट्र व कर्नाटक मधून सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार सन्मानपुर्वक शिर्डी येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
या पुरास्काराचे वितरण महाराष्ट्र व कर्नाट महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी यांचे शुभहस्ते मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे उपाध्यक्ष अंकलकोटे सुकेश झंवर यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले.उपाध्यक्ष रणजितसिंह भोसले. संचालक तुषारभाई गांधी , अमोल सस्ते, सीईओ. संदीप जगताप. यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
पुरस्काराचा स्विकार करताना दिलीपसिंह भोसले म्हणाले , ग्राहकांना चांगली सेवा, सभासदांचे हित जपत विविध सामाजिक उपक्रम संस्था राबवित असते या पुरस्काराने भविष्यात उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा व स्फुर्ती आम्हास मिळणार आहे. संस्थेचे सी.ई.ओ. व सर्व सेवकांचेही मोठया प्रमाणात कामकाजात योगदान आहे.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. फेडरेशनचे संचालक रविंद्र कानडे यांनी स्वागत केले. फेडरेशनचेअध्यक्षसुरेश वाबळे यांनी प्रास्ताविक केले साई आदर्श चे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी आभार मानले