दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । नाशिक । महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणार्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ नुकताच नाशिक येथ पार पडला. राज्यातल्या 198 शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन 2 मे रोजी नाशिकमध्ये मुख्यमंत्री, राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन, उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सोहळ्यात 2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे कृषी विभागाकडून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. पुरस्कारार्थींना रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र व सपत्नीक/ सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कारप्राप्त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हणून कृषी विभागातील विविध योजनांमध्ये कार्य करणार असल्याचेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. या कार्यक्रमाची कृषी विभागामार्फत थेट प्रक्षेपण करण्यात आले हाेते. यामध्ये मौजे सासकल ता फलटण येथील प्रयोगशील शेतकरी व श्री सचिन जाधव कृषि सहाय्यक सासकल हे ऑनलाईन जॉइन होऊन या कार्यक्रमास मध्ये उपस्थिती दाखवली. यावेळी त्यांनी पुरस्कारप्राप्त पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संपूर्ण राज्यातील वेगवेगळ्या विभागानुसार मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कृषी उत्पादन-उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि कृषी विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी-कर्मचाऱ्यांना कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.